Wednesday, September 28, 2016

मन - A State Of Mind

मन


मन माझ मंदिर,
कल्पनांचा बाजार.
श्रीमंताच झोपड,
गरीबाच महाल,
नकारात्मकतेची दीवाळ,
अन
सकारात्मकतेचे द्वार.


मन माझ मंदिर,
कल्पनांचा बाजार.
दुःखांचा अंधार,
सुखाचा प्रकाश.
निराशेच ग्रहण,
अन
आशेच किरण.


मन माझ मंदिर,
कल्पनांचा बाजार.
परिस्थितीची लाथ,
शक्यतेची हाक.
संतापाची भीषण आग,
अन
शांततेचा सुमधुर राग.


मन माझ मंदिर
कल्पनांचा बाजार.
कालचा प्रवास,
आजचा ध्यास,
उद्याचा आभास,
अन
जीवनाचा श्वास.


-निखिल सरवणकर

No comments:

Post a Comment

मुंबई